अर्ध्यावर मोडला ड्रामा क्वीनचा डाव ?


काही दिवसापूर्वी बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंतने गुपचूप लग्न केले. सोशल मीडियावर आपले ब्राइडल लूकमधील काही फोटो राखीने शेअर केले होते. तिने त्यासोबतच एका एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केल्याचे म्हटल्यानंतर हनिमुनला गेल्याचे काही फोटोही तिने शेअर केले होते. पण आता लग्नाला एक महिना होण्यापूर्वीच तिचा घटस्फोट झाल्याचे समोर येत आहे.


अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट राखीने शेअर केली होती. तिने या पोस्टमध्ये रडणाऱ्या मुलींचे अॅनिमेटेड चित्रही शेअर केले होते. तिला नेमके तिच्या या पोस्टमधून काय झाले आहे याचा उलगडा होत नसल्यामुळे अनेकांनी तिला याप्रकरणी प्रश्न विचारले आहेत. यावर अनेकांनी तिला तू घटस्फोट घेते आहेस का?, तुझे लग्न मोडले का?,असे प्रश्न विचारले आहेत. पण राखीने या प्रश्नांचे कोणतेही उत्तर दिलेले नाही.