19 वर्षांनंतर सापडलेला नोकियाचा फोन आजही 70 टक्के चार्ज


तुम्हाला नोकियाचे जुने फोन आठवत असतीलच. त्या जुन्या फोनचे वैशिष्ट म्हणजे त्यांची बँटरी. कितीही वेळ वापरला तरी त्या फोनची बँटरी उतरत नसते. आता स्मार्टफोन्सच्या काळात नोकियाचे ते जुने फोन खूप कमी जण वापरतात. मात्र तो जुना नोकियाचा फोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यास कारणही तसे खासच आहे.

इंग्लंडच्या इलेस्मेरे द्विपवर राहणाऱ्या केविन मूडीला 19 वर्षांपुर्वीचा जूना नोकिया 3310 हा मोबाईल सापडला. केविनने फोन स्विच ऑन केल्यावर त्यालाही विश्वास बसला नाही की, एवढ्या वर्षानंतर आजही त्याची बँटरी 70 टक्के चार्ज होती.

केविनने सांगितले की, काही दिवसांपुर्वी तो घराची चावी शोधत होता. तेव्हा एका कोपऱ्यात त्यांना फोन सापडला. त्याने सांगितले की, हा फोन 19 वर्षांपुर्वी खरेदी केला होता. त्याला आठवतही नव्हते की, त्याने या फोनला शेवटचे कधी चार्जिंग केले होते.

वैज्ञानिकांनुसार, नोकियाने मोबाईल फोन बनवण्याऐवजी रेन्युवल एनर्जी बनवली होती. नोकियाचे हे मॉडेल 2000 मध्ये लाँच झाले होते. हा फोन त्याकाळी चांगलाच चर्चेत होता. या फोनचे नवीन मॉडेल देखील कंपनीने दोन वर्षांपुर्वी पुन्हा लाँच केले आहे.