तब्बल 19 वर्षांपासून शौचालयात राहत असलेल्या महिलेची भावनिक कहाणी


तामिळनाडूच्या मदुरई येथील एका वयस्कर महिलेचे फोटो व्हायरल होत आहेत. या महिलेची कहानी ऐकून तुमचेही मन भरून येईल. ही 65 वर्षांची वयस्कर महिला मागील 19 वर्षांपासून सार्वजनिक शौचालयामध्ये राहत आहे. कुरापाई 19 वर्षांपासून तामिळनाडूच्या मदुरई येथील रामनाद भागातील सार्वजनिक शौचालयात राहत आहे. शौचालय साफ करूनच ती कमवते. याद्वारे ती दररोज 70 ते 80 रूपये कमवते.

कुरापाईने सांगितले की, जेष्ठ नागरिक पेंशनसाठी मी अर्ज केला होता. मी कलेक्टर कार्यालयात अनेक अधिकाऱ्यांना भेटले मात्र काहीही झाले नाही.


कमाईचे अन्य कोणतेही माध्यम नसल्याने कुरापाई यांना हे काम करावे लागत आहे. त्यांनी सांगितले की, माझ्याजवळ कमाईचे अन्य कोणतेही साधन नाही. त्यामुळे मी या सार्वजनिक शौचालयात राहते. माझी एक मुलगी असून, ती मला कधीच भेटायला येत नाही.


त्यांची ही गोष्ट ऐकून अनेकांनी त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. लोक ट्विटरवर मेसेज करत मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. एका युजरने लिहिले की, आपण मदत केली पाहिजे. मी योगदान देण्यासाठी तयार आहे. तर काहींनी लिहिले की, मदत केली पाहिजे, मी असे फोटो बघू शकत नाही.


कुरापाई यांना मदत करण्यासाठी युजर्सनी सरकारी अधिकाऱ्यांना टॅग करत त्यांना मदत करण्याचे निवेदन केले.

Leave a Comment