जेफ बेझॉस यांनी शेअर केली 25 वर्षांपुर्वीची ही खास गोष्ट


जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी आज 25 वर्षांपुर्वी त्यांनी नोकरीसाठी दिलेली जाहीरात शेअर केली. जेफ बेझॉस यांनी ही जाहीरात 22 ऑगस्ट 1994 ला दिली होती. त्यावेळी जेफ बेझॉस यांच्या कंपनीचे अ‍ॅमेझॉन हे नाव देखील निश्चित झालेले नव्हते. आज तिच अ‍ॅमेझॉन कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी असून, तेथे 6 लाख लोक काम करतात.


25 वर्षांपुर्वी दिलेल्या जाहीरातीमध्ये जेफ बेझॉस यांनी लिहिले होते की, चांगले भांडवल असलेले स्टार्ट अपला सी/सी++/युनिक्स डेव्हलपर हवे आहेत. तुम्ही बीए, एमएस अथवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी झालेले असणे आवश्यक आहे. तसेच योग्य कम्युनिकेशन स्किल्स असणे गरजेचे आहे. याचबरोबर वेब सर्वस आणि एचटीएमलची माहिती असेल तर अगदी उत्तम. जेफ बेझॉस यांनी ही जाहीरात दिली त्यावेळी, एक चांगली नोकरी सोडून ई-कॉमर्स कंपनी सुरू केली होती.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना बेझॉस यांनी लिहिले की, मी ही जाहीरात याचदिवशी 25 वर्षांपुर्वी दिली होती. त्यावेळी अ‍ॅमेझॉन कंपनीचे नाव देखील ठरले नव्हते. कालचीच गोष्ट असल्यासारखे वाटत आहे. या जाहीरातीद्वारे शेल कँपहनला नोकरी मिळाली होती. त्याने त्यानंतर पाच वर्षांनी ती नोकरी सोडली.

जेफ बेझॉस यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. 70 हजार पेक्षा अधिक जणांनी ही पोस्ट लाईक केली तर शेकडो कमेंट्स देखील या पोस्टवर आल्या आहेत.

Leave a Comment