सध्या प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा साहो चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हे दोन्ही कलाकार व्यस्त असतानाच, साहो चित्रपटासाठी श्रद्धाने ८ कोटी रुपये मानधन घेतल्याचे वृत्त आहे.
साहोसाठी श्रद्धाने घेतले एवढे मानधन
याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार हे वृत्त पुर्णतः खोटे असून ही केवळ पीआरसाठी सांगितलेली रक्कम आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत टॉलिवूडमधील कलाकारांना अगदी कमी पैशात काम करावे लागते. त्यामुळे, श्रद्धाला या चित्रपटासाठी केवळ ३ कोटी मानधन मिळाले असल्याचे म्हटले जात आहे.
श्रद्धापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटासाठी कॅटरिना कैफकडे विचारणा केली होती. मात्र, तिनं ५ कोटींची मागणी केल्याने हा चित्रपट श्रद्धाच्या हाती आला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, येत्या ३० ऑगस्टला सुजित यांचे दिग्दर्शन असलेला बिग बजेट साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.