रेडमी नोट ८, नोट प्रो, २९ ऑगस्टला लाँच


चीनी शाओमी चा सबब्रांड रेडमी येत्या २९ ऑगस्टला चीनमध्ये रेड मी नोट ८ आणि नोट ८ प्रो लाँच करत असल्याचे विबोवर पोस्ट करून कंपनीने जाहीर केले आहे. हे दोन्ही फोन भारतात चौथ्या तिमाहीत येतील असे समजते. नोट ७ आणि नोट ७ प्रो चे हे अपग्रेड व्हर्जन आहे. नोट ८ प्रो हा रिअर मध्ये ६४ एमपीचा प्रायमरी सेन्सर असलेला पहिला स्मार्टफोन आहे. त्याची टीझर इमेज सादर केली गेली आहे.

त्यानुसार या फोनमध्ये रिअरला एलइडी फ्लॅश सह क्वाड कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या मागच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर असून स्मार्टफोन सँडविच डिझाईनमध्ये आहे. ६४ + ५ + २ चा रिअर कॅमेरा सेट असून सेल्फी साठी २५ एमपी कॅमेरा दिला गेला आहे. अँड्राईड पाय ९.० वर आधारित मीयुआय १० वर चालणारी ओएस, ६ आणि ८ जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी स्टोरेज, अशी त्याची अन्य फीचर्स आहेत. हे फोन साधारण १४ ते १५ हजार रुपयांच्या किमतीत मिळतील असे समजते.

Leave a Comment