मानवादित्य राठोडचा निशाणेबाजीत सुवर्णवेध


माजी केंद्रीय क्रीडामंत्री आणि ऑलिम्पिक रजतपदक विजेते राज्यवर्धन राठोड यांचा मुलगा मानवादित्य राठोड याने वडिलांच्या पुढे एक पाउल टाकताना निशाणेबाजीत सुर्वण पदकांची लुट केली आहे. राजस्थान स्टेट ओपन शुटींग चँपियनशिप स्पर्धेत त्याने विविध प्रकारात तीन सुवर्ण आणि एका रजत पदकाची कमाई केली आहे. ट्रॅम्प ज्युनिअर, डबल ट्रॅम्प सिनिअर, व ज्युनिअरमध्ये सुवर्ण मिळविणाऱ्या मानवादित्यला सिनिअर ट्रॅम्पमध्ये रजत पदकावर समाधान मानावे लागले आहे. जयपूर जगतपुरा शुटींग रेंज मध्ये या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.

मानवादित्यने यापूर्वी खेलो इंडिया इंडियन युथ गेम्स २०१९ मध्ये २१ वर्षाखालील पुरुष गटात ट्रॅम्प मध्ये गोल्ड मिळविले आहे. तो सांगतो, स्पर्धत तुमच्यासमोर दोनच पर्याय असतात एकतर लढा किंवा पराभव मान्य करा. आपण सराव करताना खूप कष्ट घेतले असतील तर आपले मन पराभव मान्य करायला तयार नसते त्यामुळे जे मिळवायचे त्यासाठी लढणे भाग असते. या स्पर्धेतून मला स्वतःचीच पारख करता आली याचे समाधान आहे.

राज्यवर्धन राठोड यांनी २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये डबल ट्रॅम्प इव्हेंट मध्ये रजतपदकाची कमाई केली असून मोदी सरकारच्या पहिल्या काळात ते क्रीडामंत्री होते. २०१९ लोकसभेत ते खासदार आहेत.

Leave a Comment