बॉलीवूड सेलेब्सना फंकी सनग्लासेसची लागण


बॉलीवूड सेलेब्रिटी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे कपडे, दागिने, त्यांचे जाणेयेणे, जिम, खाणेपिणे अश्या अनेक बाबींवर सतत काही ना काही छापून येते आणि देशातील तरुणाई ते आवडीने वाचतेही. आता सध्या बॉलीवूड सेलेब्सना वेगळीच लागण झाली असून सध्या बहुतेक सर्व सेलेब्रिटी चित्रविचित्र किंवा तरुणाईच्या भाषेत सांगायचे तर फंकी सनग्लासेस वापरताना दिसत आहेत.

क्रीती सेनन फारशी फॅशनक्रेझी नाही तरीही तिला अलीकडेच अजब डिझाईनचे पांढऱ्या रंगाचे सनग्लासेस घातलेले पाहिले गेले आहे. तिचा दिलवाले चा को स्टार वरूण धवन यानेही डान्स रिहर्सल करून बाहेर पडताना ओव्हरसाईज फ्रेमचे सनग्लासेस घातलेले दिसले आहे. आलीया भट्ट सडक दोनचे शुटींग करून परतत असताना मल्टीकलर रंगाच्या सनग्लासेस मध्ये दिसली तर तिच्या म्युझिक अल्बम प्राडा मध्येही ती फंकी गॉगल्स मध्ये दिसली आहे.
परिणीती चोप्रा विमानतळावर रीफ्लेक्टीव्ह सनग्लासेस मध्ये स्पॉट केली गेली तर सोनाक्षी सिन्हा शुटींग दरम्यान शार्प कट आयवेअर मध्ये दिसली आहे. अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग ओव्हरसाईज कलरफुल सनग्लासेस मध्ये दिसले आहेत. त्यामुळे आता तरुणाईत फंकी सनग्लासेसची क्रेझ दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

Leave a Comment