येथे आहे जगातील सर्वात मोठे सायकल पार्किंग


नेदरलँडच्या उट्रेच शहरात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या सायकल पार्किंगचे काम पुर्ण झाले आहे.  सोमवारी या पार्किंगला उघडण्यात आले. तीन मजल्यांच्या या पार्किंगमध्ये 12500 सायकल पार्क करता येतील. येथे ठेवण्यात येणाऱ्या स्टँडवर सायकली लावता येणार आहेत. हे पार्किंग मोफत असून, 24 तास सुरू राहणार आहे.

हे पार्किंग रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार करून बनवण्यात आले आहे. येथे डिजिटल सायकल स्पेस इंडिकेशन लावण्यात आलेले आहे. यामुळे येणाऱ्यांना सायकलसाठी मोकळी जागा शोधण्यास मदत होईल. देशातील सायकल चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, हे पार्किंग लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

नेदरलँड सरकारने 2017 मध्ये सायकल पार्किंग आणि रस्ता बनवण्यासाठी 792 करोड रूपयांच्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. उट्रेजचे काउंसिलर विक्टर एवरहार्डने सांगितले की,  लोकांनी जास्तीत जास्त सायकल चालवावी व स्वस्थ राहावे ही सरकारची इच्छा आहे.

टॉप -5 देश, जेथे लोक सर्वाधिक सायकल चालवतात –
देश            लोकसंख्या      सायकल   
नेदरलँड – 1.71 करोड – 1.60 करोड
डेनमार्क – 57 लाख   – 45 लाख
जर्मनी –  8.35 करोड – 6.20 लाख
स्वीडन – 90.41 लाख  – 60 लाख
नॉर्वे  –       54 लाख  –       34 लाख

सायकल ठेवण्याच्या व चालवण्याच्या यादीत फिलनँड 6व्या, जापान 7 व्या, स्विर्झलँड 8व्या, बेल्जियम 9 व्या आणि चीन 10व्या स्थानावर आहे.

Leave a Comment