अभिनंदन यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वीणा मलिकला नेटकऱ्यांनी झापले


पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक नेहमीच भारत विरोधी विधाने केल्याने चर्चेत असते. आता भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो शेअर करत तिने विवादित ट्विट केले आहे. वीणाने केलेल्या या पोस्टमुळे भारतीय युजर्सच चांगलेच भडकले व त्यांनी तिला धारेवर धरले.

वीणा मलिकने अभिनंदन यांचे दोन फोटो शेअर केले. यात एका फोटोमध्ये अभिनंदन विमानासमोर उभे आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये जखमी अवस्थेत पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडले आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, फोटो सर्व काही सांगून जात आहे. आधी आणि नंतर.

वीणाने केलेल्या या ट्विटवर भारतीय युजर्सच चांगलेच भडकले. एका भारतीय युजर्सने मीम शेअर केले, ज्यामध्ये इम्रान खान भिक मागत आहेत.

एका युजर्सने तर लिहिले की, या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कधी युध्द जिंकले नाही, आतंकवाद्यांशी लढत नाहीत. मग यांना मेडल्स कसे मिळतात.

चीन आणि पाकिस्तानवर देखील भारतीय युजर्सनी मिम्स शेअर केले.

याआधी वीणा मलिकने सुष्मा स्वराज यांच्या निधनानंतर देखील विवादित ट्विट केले होते. तसेच नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजईला काश्मीर मुद्यावर न बोलण्यावरही तिने विवादित विधान केले होते.