असे हॉटेल जेथे कूस बदलताच लोक दुसऱ्या देशात जातात


जगभरात अनेक हॉटेल्स हे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे, त्यांच्या अलिशानपणामुळे ओळखली जातात. मात्र तुम्ही कधी अशा हॉटेलबद्दल ऐकले आहे का जेथे झोपेत कूस बदलल्यावर लोक थेट एका देशातून दुसऱ्या देशात जातात ? हो, हे सत्य आहे. या हॉटेलचे नाव अर्बेज हॉटेल आहे.

हॉटेलला अर्बेज फ्रांको-सुइसे हॉटेल नावाने देखील ओळखले जाते. हे हॉटेल फ्रांस आणि स्विर्झलँडच्या सीमेवरील ला क्योर या भागात आहे. हे हॉटेल दोन्ही देशात येत असल्याने याचे पत्ते देखील दोन आहेत.

या हॉटेल्सचे खास गोष्ट म्हणजे फ्रांस आणि स्विर्झलँडची सीमा या हॉटेलच्या मध्यभागातून जाते. या हॉटेलच्या आत जाताच लोक एका देशातून दुसऱ्या देशात जातात.

अर्बेज हॉटेलचे विभाजन हे दोन्ही देशांच्या सीमा लक्षात घेऊन करण्यात आले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या हॉटेलचा बार हा स्विर्झलँडमध्ये येतो तर बाथरूम हे फ्रांसमध्ये आहे.

या हॉटेलच्या सर्व रूमला दोन भागात विभागण्यात आले आहे. रूममध्ये डबल बेड असे ठेवण्यात आले आहेत की, ते अर्धे फ्रांसमध्ये तर अर्धे स्विर्झलँडमध्ये आहेत.

या हॉटेलच्या जागी आधी एक दुकान होते. 1921 मध्ये जूल्स-जीन अर्बेजे नावाच्या एका व्यक्तीने ही जागा खरेदी करत येथे हॉटेल बनवले. आता हे हॉटेल फ्रांस आणि स्विर्झलँड या दोन्ही देशांची ओळख बनले आहे.

Leave a Comment