पृथ्वीवरच तयार करण्यात आला मंगळ ग्रह, पैसे भरून तुम्ही करू शकता प्रवास


मंगळ ग्रहावर जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हॉलिडे वेबसाइट ट्रिप एडवाइजरने पृथ्वीवरतीच कृत्रिम गृह तयार केला आहे. मंगळ ग्रहासारखा दिसणारा आर्टिफिशियल प्लँनेट उत्तर स्पेनमधील गुहेत तयार करण्यात आला आहे. कंपनीने पर्यटकांना येथे तीन रात्र आणि तीन दिवस राहण्यासाठी ऑफर देखील दिली आहे. यासाठी पर्यटकांना 4.80 लाख रूपये भरावे लागतील.

हा कृत्रिम ग्रह पृथ्वीपासून 196 फूट उंचावर असून, येथे 1.4 किलोमीटर लांब गुहा देखील आहे. दावा करण्यात येत आहे की, गुहेत एकदम मंगळ ग्रहासारखी स्थिती पाहायला मिळेल. या ग्रहाचे पहिले ट्रायल पुर्ण झाले आहे. आता कंपनीने हा कृत्रिम ग्रह पर्यटकांसाठी उघडला आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, येथे येण्यासाठी पर्यटकांना आधी 30 दिवसांच्या कार्यक्रमाचा भाग व्हावे लागेल. यामध्ये त्यांना तीन आठवडे ऑनलाइन ट्रेनिंग देण्यात येईल. त्यानंतर त्यांना शारिरीक व मानसिक रूपाने सक्षम करण्यासाठी 3 दिवसांची ट्रेनिंग देण्यात येईल. त्यानंतर त्यांना 3 दिवस व 3 रात्रीच्या प्रवासावर जाण्याची परवानगी मिळेल. पर्यटकांना खास उपकरण परिधान करूनच या ग्रहावर जावे लागेल.

कंपनीनुसार, तीन दिवसांसाठी 4,80,000 रूपये भरावे लागतील. तुम्हाला देखील एडव्हेंचर अनुभवायचे असेल तर तुम्ही देखील या ठिकाणी जाऊ शकता. हा ग्रह तयार करणाऱ्या कंपनीचे सीईओ डेव्हिड सेबलोस यांचे म्हणणे आहे की, आम्ही ट्रिप एडवाइजरबरोबर मिळून काम करत आहोत. स्पेस टेक्नोलॉजीमध्ये गुंतवणूक करणे हे देखील एक नाविन्यच आहे.

Leave a Comment