‘या’ राज्यातील देवाला अपर्ण केला जातो चक्क ‘विंचू’


एक विचित्र परंपरा आपल्या देशातील आंध्र प्रदेशामधील कुर्नूल जिल्ह्यातील कोडूमूर गावात असून श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथील व्यंकटेश्वर मंदिरात देवाला चक्क जिवंत विंचू अर्पण करण्याची अजब परंपरा आहे. तसेच, देवाला जिवंत विंचूंनी सुशोभितही केले जाते. हे मंदिर गावातील डोंगरावर असून अनेक दशकांपासून ही परंपरा चालत आली आहे.

या दिवशी अगदी जोरदार डंख मारणारे विंचू देखील शांत असतात. ते भाविकांना या दिवशी काहीही नुकसान पोहोचवत नाहीत. त्या दिवशी एखाद्या विंचवाने चुकून कुणाला दंश केलाच तर, त्या दंशाच्या वेदना फार काळ राहत नाहीत. मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर या वेदना निघून जातात, असे येथे येणारे भाविक सांगतात. मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात हा विंचू उत्सव येथे साजरा केला जातो.

राज्यभरातील निःसंतान जोडपीही येथे देवदर्शनासाठी येतात. आपल्या विविध इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी देवाची प्रार्थना करतात. या दिवशी डोंगरावरील दगडांमध्ये, खडकांमध्ये लपलेले विंचू भाविकांमधील महिला, लहान मुले, पुरुष शोधतात. त्यांना पकडून न घाबरता धार्मिक विधींसाठी घेऊन जातात.

Loading RSS Feed

Leave a Comment