एवढ्या कोटींची मालकीन आहे सनी लिओन


यंदाचे वर्ष खऱ्या अर्थाने बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनला महत्वाचे ठरले आहे. सनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत येत आहे. त्यातच तिच्या जीवनावर आधारित ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ हा बायोपिकमुळे तिचा जीवनप्रवास जगासमोर आला. तिचा जीवनप्रवास पाहून तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली.

करिअरच्या सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम करत सनीने अनेकांच्या मनात घर केल्यानंतर सनी भारतात आली. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘जिम्स २’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनीने पहिल्याच चित्रपटातून अनेकांच्या मनावर जादू केली आणि प्रेक्षकांमध्ये ती लोकप्रिय ठरली. आतापर्यंत सतराहून अधिक चित्रपटांमध्ये सनीने काम केले आहे. त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स नाऊ न्यूज’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ९७ कोटींची सनी मालकीण असून त्याचबरोबर अनेक महागड्या गाड्या देखील तिच्याकडे आहेत. जवळपास ३ कोटी रुपये मुंबईमधील सनीच्या बंगल्याची किंमत आहे तर ३०कोटींहून अधिक अमेरिकेतील बंगल्याची किंमत असल्याचे म्हटले जात आहे.

डॅनिअल वेबरसह २०११मध्ये सनी लग्न बंधनात अडकली. एका पार्टीमध्ये त्यांची पहिली ओळख झाली होती. काही वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१७मध्ये त्यांनी निशाला दत्तक घेतले आणि २०१८मध्ये सरोगसीने त्यांना दोन जुळी मुले झाली. अनेक वेळा सनी तिच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Loading RSS Feed

Leave a Comment