या देशात सिगारेटचा एक झुरका पडेल महागात


धुम्रपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अनेक देशात सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिल्यावर दंड आकारला जातो. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी अनेकजण घरात सिगरेट पितात. मात्र आता थायलंडमध्ये करण्यात आलेल्या नवीन कायद्यानुसार, घरात सिगरेट पिता येणार नाही. घरात सिगरेट पिल्यावर त्या व्यक्तीच्या विरोधात डोमेस्टिक वॉयलेंड अर्थात घरगुती हिंसेचा गुन्हा दाखल होईल.

डब्ल्यूएचओनुसार, दरवर्षी स्मोकिंगमुळे 6 लाख लोकांचे प्राण जातात. यामध्ये 60 टक्के ही लहान मुलं असतात. घरात असणाऱ्या मुलांच्या आणि परिवाराच्या आरोग्याचा विचार करत थायलंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. फॅमिली प्रोटेक्शन अँन्ड डेव्हलपमेंट प्रोमोशन अक्ट अंतर्गत हा कायदा करण्यात आला आहे.

बँकॉकमध्ये झालेल्या टबैकू अँन्ड हेल्थ कॉन्फ्रंसमध्ये बूराना बंडित यांनी सांगितले की, परिवारातील सदस्यांच्या आरोग्यावर स्मोकिंगमुळे परिणाम झाला तर धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात केस दाखल केली जाईल. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला पुनर्वास केंद्रात पाठवले जाईल.

थायलंडमध्ये वेगवेगळे सेंटर्स या केस संदर्भात चौकशी करेल. सुरूवातीला पोलिस तपास केला जाईल त्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment