गुगलने विकत घेतलेल्या या कंपनीचा सह-संस्थापक सक्तीच्या रजेवर


डीपमाइंड या आर्टिफिशल इंटेलिजेंसी रिसर्च कंपनीचे सह-संस्थापक मुस्तफा सुलेमान यांना काही दिवसांसाठी रजेवर पाठवण्यात आलेले आहे. डीपमाइंडच्या प्रवक्त्यांनी मुस्तफा यांनी 10 वर्ष सतत काम केल्यानंतर काही काळ ब्रेक घेत असल्याचे म्हटले आहे. डीपमाइंड ही कंपनी 2014 मध्ये गुगलने विकत घेतली होती.

डीपमाइंडच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ते काही काळासाठी रजेवर गेले असून, सर्व संमतीने हा निर्णय घेण्यात आला असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत ते परतू शकतात.

सुलेमान हे एप्लाईड डिव्हिजन या गटाचे प्रमुख होते. हा ग्रुप आरोग्य आणि उर्जा या क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजेंसी रिसर्चवर कार्य करतो.

याआधी सुलेमान यांनी कंपनीतील वादग्रस्त आरोग्य विभाग तयार करण्यास मदत केली होती. हा प्रोजेक्ट किडनी रिसर्चबद्दल काम करतो. या विभागाने 1.6 मिलियन रूग्णांच्या आरोग्याचा डाटा अयोग्यरित्या जमा केला होता. 2010 मध्ये डीपमाइंड हेल्थ ग्रुपचा समावेश गुगल हेल्थमध्ये करण्यात आला होता व त्यानंतर सुलेमान यांनी आपले पद सोडले होते.

2010 मध्ये ही कंपनी सुलेमान, शेन लेग आणि सध्याची सीईओ डेमिस हसबीस यांनी सुरू केली होती. डीपमाइंडचे ध्येय हे इंटेलिजेंसीद्वारे विज्ञानातील काही अवघड प्रश्नांची उत्तरे शोधणे हे आहे. 2014 मध्ये गुगलने एआय कंपनीला 400 मिलियन पाउंड्समध्ये खरेदी केले होते.

Leave a Comment