भारतात लाँच झाली किआ मोटर्सची पहिली कार , किंमत 9.69 लाखांपासून सुरू


किआ मोटर्स इंडियाने भारतात त्यांची पहिली कार किआ सेल्टोस लाँच केली आहे. या कारची दिल्लीतील एक्सशोरूम किंमत 9.69 लाख रूपये आहे. ही किंमत सेल्टोस टेक लाइनची आहे. तसेच याच्या टॉप वेरिएंटची किंमत 15.99 लाख रूपयांपर्यंत आहे. ही कार वेगवेगळ्या सात रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

किआ ही साउथ कोरियाची कंपनी आहे. या कार बरोबरच कंपनीने भारतीय बाजारात एंट्री केली असून, ही कार आता ह्युंडईची क्रेटा, टाटा हँरियर आणि एमजी हेक्टर यांना टक्कर देईल.

एसयूवीच्या फ्रंटमध्ये किआचे सिग्नेचर टायगर नोज ग्रिल देण्यात आले आहे. तसेच, स्लीक एलईडी हेडलँम्प, एलईडी डीआरएल आणि एलईडी टेल लँम्प्स देण्यात आले आहे. सेल्टॉसमध्ये 17-इंचचे अलॉय व्हिल्ज, फ्लोटिंग रूफ, सनरूफ आणि रूफ रेल्स देखील आहे.

कँबिनमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 8-इंचचे हेड्स-अप डिस्प्ले मिळेल. कारमध्ये UVO Connect नावाची कनेक्टिविटी सिस्टम असेल.

किआ सेल्टॉसमध्ये इंजिनचे तीन विकल्प आहेत. ज्यामध्ये 1.4-लीटर पेट्रोल टर्बोचार्ज्ड, 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनचा समावेश आहे.