साहोच्या गाण्यासाठी जॅकलिनने घेतले एवढे मानधन


सिनेरसिकांमध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या आगामी साहो या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. २०१९मधील बिग बजेट हा चित्रपट ठरला असल्यामुळेच प्रत्येक कलाकारानेदेखील या चित्रपटासाठी तितकेच दमदार मानधन घेतले आहे. त्यातच या चित्रपटातील एका गाण्यासाठी आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने किती मानधन घेतले हे समोर आले आहे.

या चित्रपटातील बॅड बॉय हे गाणे काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रभास आणि जॅकलीन यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले असून या गाण्यासाठी तब्बल २ कोटी रुपये जॅकलीनने घेतले आहेत. जॅकलीनने केवळ एका गाण्यासाठी एवढे मानधन घेतल्यामुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.

Leave a Comment