विराटसेनेच्या शर्टलेस पोझवर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया


अँटिगा: अँटिगा येथून एक खास फोटो टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शेअर केला असून भारतीय क्रिकेट टीममधील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य टीम इंडियाच्या या फोटोमध्ये दिसत आहेत. आपल्याला या सर्वांचा एक खास आणि वेगळा अंदाज या फोटोत पहायला मिळत आहे. विराट कोहलीने शेअर केलेला हा फोटो पाहून क्रिकेटप्रेमींमध्ये टीम इंडियातील प्लेअर्सच्या अॅब्स, फिट बॉडी आणि रोहित शर्माची सर्वाधिक चर्चा होत आहे.


जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या दोघांचे अॅब्स टीम इंडियाच्या या फोटोमध्ये खूपच खास दिसत आहेत. तर बुमराहच्या शेजारी उभ्या असलेला मयांक अग्रवाल सुद्धा या दोघांना अॅब्सच्या बाबतीत टक्कर देताना दिसत आहे. रोहित शर्मा सुद्धा या फोटोत दिसत आहे. पण तो नेहमी प्रमाणे यावेळी सुद्धा सर्वांच्या मागे दिसत आहे. लोकेश राहुलच्या मागे रोहित शर्मा हा दिसत आहे. आता जलदगती गोलंदाज इशांत शर्मासुद्धा टीम इंडियासोबत जॉईन झाला आहे.


टीम इंडियाचा हा फोटो विराट कोहलीने शेअर केल्यानंतर त्यावर क्रिकेटप्रेमींनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित शर्मा हाच क्रिकेटप्रेमींनी केलेल्या कमेंट्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. बऱ्याच दिवसांनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा असा फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये विराट आणि रोहित शर्मा एकत्र दिसत असल्यामुळेच क्रिकेटप्रेमी सुद्धा याकडे पाहून कमेंट्स करताना दिसत आहेत.

दरम्यान या फोटोवर भाष्य करताना युवराज सिंहने लिहिले, ‘ओहो .. फिटनेस आयडॉल.’ विशेष म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया सध्या क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात यश संपादन करत आहे. भारतीय संघ सध्या कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे.

Leave a Comment