हा आहे जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता


फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली असून, या यादीत हॉलिवूड स्टार ड्वेन जॉनसन पहिल्या स्थानावर आहे. रेसलिंगमध्ये द रॉक नावाने प्रसिध्द झाल्यानंतर अभिनेता बनलेल्या ड्वेन जॉनसने ‘जुमांझी’ आणि ‘फास्ट अँन्ड फ्युरियस’ या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फोर्ब्सनुसार, ड्वेनने जून 2018 ते जून 2019 या एकावर्षात 89.4 मिलियन डॉलर  (6,41,00,24,700 रूपये) एवढी कमाई केली आहे. यामध्ये त्याच्या पगार आणि चित्रपटांद्वारे होणाऱ्या नफ्याचा देखील समावेश आहे. तसेच एचबीओ वर येणाऱ्या ‘बँलर्स’ या सिरिजच्या प्रत्येक भागातून मिळणाऱ्या 700,000 डॉलर (5,00,76,600 रुपये) आणि कपडे, बुट, हेडफोन याद्वारे मिळणाऱ्या रॉयल्टीचा देखील समावेश आहे.

या यादीत एवेंजर्स एंडगेम स्टार्स क्रिस हेमस्वर्थ आणि रॉबर्ट डाउनी जुनियर यांचा देखील समावेश आहे. फोर्ब्सनुसार, क्रिस हेमस्वर्थची कमाई 76.4 मिलियन डॉलर आणि रॉबर्टची कमाई 66 मिलियन डॉलर आहे. या टॉप-10 मध्ये ब्रँडली कूपर, क्रिस इवांस आणि पॉल रूड यांचाही समावेश आहे. ब्रँडली कूपरने ‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटातून 40 मिलियन डॉलरची कमाई केली.

फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूड स्टार अक्षय कुमार चौथ्या स्थानावर आहे. त्याची एकूण कमाई 65 मिलियन डॉलर आहे. अक्षय नंतर जँकी चेनने 58 मिलियन डॉलरची कमाई करत या यादीत स्थान मिळवले.

Leave a Comment