हे डिव्हाईस सांगणार जेवण खराब आहे की नाही


जेवण खराब आहे की नाही, हे समजण्यासाठी आता त्याचा वास घेण्याची गरज नाही. आता हे काम एक सेंसर करणार असून, तुमच्या मोबाईलमध्ये हे सेंसर जोडलेले असेल. हे सेंसर इको फ्रेंडली असण्याबरोबरच स्वस्त देखील आहे.

ब्रिटनमध्ये तीनपैकी एक ग्राहक खाण्याचे पॉकिट एक्सपायरी डेट जवळ आली असल्याने टाकून देतो. यामध्ये 42 लाख टन भोजन असे असते, जे खाल्ले जाऊ शकते. लंडनमधील इम्पिरियल कॉलेजद्वारे तयार करण्यात आलेले सेंसर अन्न खराब करणाऱ्या अमोनिया आणि ट्राइमिथायलामाइनचा शोध घेऊन अन्नाच्या गुणवत्तेची माहिती देईल. या सेंसरला ‘पेपर इलेक्ट्रिकल गँस सेंसर’ (पीईजीएस) म्हटले जात आहे.

सेंसरची किंमत दीड रूपये –
या सेंसरची किंमत केवळ दीड रूपये आहे. लोकांना स्मार्ट फोनद्वारे सेंसरचा डाटा मिळू शकेल. लोकांना केवळ आपला फोन सेंसरच्या वरती ठेवायचा आहे, त्यानंतर त्यांना जेवण खाण्यायोग्य आहे की, नाही याची माहिती मिळेल. संशोधकांनी कार्बन इलेक्ट्रोडला सेलुलोज पेपरमध्ये प्रिंटकरून तयार केले आहे.

प्रयोगशाळेत या सेंसर परिक्षण यशस्वीरित्या करण्यात आले. हे सेंसर बाजारात उपलब्ध असलेल्या सेंसरच्या तुलनेत अधिक उत्तम व स्वस्त आहे. एसीएस सेंसर्स जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, पँकिंग अन्नावर तारीख नमूद करण्याऐवजी हे सेंसरच लावले जाऊ शकते. हे जास्त योग्य व विश्वसनीय आहे.

या शोधाचे प्रमुख डॉ. फिरात गुडेर म्हणाले की, हे एकमात्र सेंसर असे आहे, ज्याचा व्यावसायिक स्तरावर वापर केला जाऊ शकेल. लोक नमूद तारखेला विश्वसनीय समजत नाहीत. हे सेंसर स्वस्त असल्याने वस्तूच्या किंमतीवर देखील मोठा परिणाम होणार नाही.