ही अभिनेत्री बनवणार रोमिओ–ज्यूलिएट कादंबरीवर पॉर्न चित्रपट


बेला थॉर्नने अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात आपल्या दर्जेदार कामगिरीचा ठसा उमटवल्यानंतर तिने आपला मोर्चा आता पॉर्न चित्रपटांच्या दिशेने वळवला आहे. पॉर्नहब या प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटसाठी ती एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. विल्यम शेक्सपियर यांच्या रोमिओ–ज्यूलिएट या कादंबरीवर हा चित्रपट आधारित असून लवकरच जर्मनीमध्ये याचे चित्रीकरण सुरु होणार असल्याची माहिती पॉर्न हबचे सर्वेसर्वा कोरी प्राईज यांनी दिली आहे.

आजवर आपण पाहिले किंवा ऐकले असेलच की अनेक अभिनेत्रींनी आर्थिक संकटात सापडल्यानंतर आपले आलिशान राहणीमान टिकवण्यासाठी पॉर्न पॉर्न सिनेसृष्टीचा आसरा घेतला आणि आजवरचा असा इतिहास आहे. पण हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी बेला थॉर्न एक असल्यामुळे पॉर्न सिनेसृष्टीत तिचे झालेले पदार्पण पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बेला थॉर्नच्या मते पैसे कमावण्यासाठी प्रत्येक गोष्ट केली जात नाही. आजवर अॅनिमेशन, विनोदी, थरारपट, भयपट अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तिला आता वेगळ्या प्रकारच्या चित्रपटामध्ये काम करायचे असल्यामुळे आता पॉर्न चित्रपटांच्या दिशेने तिने आपला मोर्चा वळवला आहे. सिलवेस्टर स्टेलॉन, जॅकी चॅन, कॅमेरॉन डायझ, आर्नोल्ड श्वार्झनेगर यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी याआधी पॉर्न चित्रपटांमध्ये काम केले आहे.