रूपे कार्ड लाँच करणारा पाहिला प. आशियाई देश बनणार युएई


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईच्या दौऱ्यावर जाणार असून त्यांच्या उपस्थितीत रूपे हे भारतीय पेमेंट गेटवे कार्ड तेथे लाँच केले जाणार आहे. मास्टरकार्ड, व्हिसा सारख्या आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवे कार्ड प्रमाणे ग्राहक रुपेचा वापर करू शकणार आहेत. युएई हे कार्ड लाँच करणारा पहिला पश्चिम आशियाई देश बनणार आहे. याच दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांना युएईचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ जायद पदक ‘ दिले जाणार आहे.

युएईमधले भारताचे राजदूत नवदीपसिंग सुरी या संदर्भात म्हणाले, भारत व युएईच्या पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये इंटरफेससाठी तंत्रज्ञान स्थापन केले जात आहे. नॅशनल पेमेंटस कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि युएईच्या मर्कारी पेमेंट सर्व्हिसेस मध्ये तसा करार केला गेला आहे. त्यामुळे युएईमध्ये रूपे वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. येथे मोठ्या संख्येने भारतीय आहेत आणि युएई बडे व्यापारी केंद्र आहे. या ठिकाणी सर्वाधिक संख्येने भारतीय पर्यटक येतात. युएइचा सर्वात मोठा द्विपक्षीय व्यवसाय भारतासोबत आहे. त्यामुळे रूपे वापरता येण्याची सुविधा मिळाल्याने पर्यटन, व्यवसाय आणि भारतीय समुदाय यांना मोठा फायदा होणार आहे.

सध्याच्या घडीला रूपे सिंगापूर आणि भूतान येथे वापरण्याची सुविधा सुरु झाली आहे.

Leave a Comment