फुटबॉल मधील रोनाल्डो नावाचे वादळ शमणार?


फुटबॉल म्हटले कि ज्याचे नाव सर्वप्रथम क्रीडारसिकांच्या जिभेवर येते तो पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो पुढच्या वर्षात खेळ संन्यास घेईल असे संकेत मिळत आहेत. फुटबॉल जगतात रोनाल्डो आणि मेस्सी याच्यातील स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. रोनाल्डो सध्या इटालियन सिरी ए चा चँपियन युवेन्टस क्लबकडून खेळत आहे. गोल डॉट कॉमच्या अहवालानुसार रोनाल्डोने पुढच्या वर्षात कदाचित खेळातून निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.

एका मुलाखतीत त्याला निवृत्ती बाबत विचारले गेले तेव्हा त्याने त्याबाबत विचार करत नसल्याचे सांगितले मात्र लगोलग त्याने पुढच्या वर्षीही मी निवृत्ती घेऊ शकतो किंवा ४०-४१ वर्षापर्यंत खेळू शकतो असे सांगितले. रोनाल्डो ला पाच वेळा सर्वश्रेष्ठ फुटबॉलर निवडले गेले असून तो म्हणतो या खेळातील प्रत्येक क्षणाचा मी मनापासून आनंद घेतला आहे. हा माझ्यासाठी चांगला काळ आहे. ३४ वर्षीय रोनाल्डोने अनेक रेकॉर्ड तोडली आहेत. त्याने ४३ सामन्यात २८ गोल केले आहेत.

Leave a Comment