जगभरात बिकिनी एअरलाईन म्हणून चर्चेत आलेल्या व्हीएतनाम बजेट एअरलाईनने त्याची सेवा भारतात २० ऑगस्टपासून सुरु केली असून पहिल्या तीन दिवसांसाठी स्पेशल प्रमोशन थ्री गोल्डन डेज सुपर सेव्हिंग तिकिटे ऑफर केली. २० ते २२ ऑगस्टदरम्यान प्रवासी या योजनेखाली फक्त ९ रुपयात तिकीट खरेदी करू शकणार आहेत. अर्थात वॅट, विमानतळ शुल्क आणि अन्य सरचार्ज वेगळे भरावे लागणार आहेत. ही सेवा नवी दिल्ली – हनोई, हो ची मिन्ह शहरदारम्यान सुरु झाली आहे.
बिकिनी एअरलाईनची सेवा भारतात सुरु
२०११ मध्ये एका जाहिरातीत तमाम क्रू मेंबर बिकिनीत दिसल्यानंतर व्हिएतनाम बजेट एअरलाईन जगभरात एकदम चर्चेत आली होती. सध्या ही एअरलाईन रोज ४०० उड्डाणे संचालित करत आहे. ८ कोटी प्रवाशांनी आजच्या तारखेपर्यंत या एअरलाईन सेवेचा लाभ केला आहे. देश विदेशात १२९ मार्गांवर ही सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे इंडीगोने हो ची मिन्ह व कोलकाता दरम्यात ऑक्टोबर पासून विमान सेवा सुरु केली जात असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.