डेंग्यूपुढे विक्की कौशलची शरणागती


उरी द सर्जिकल स्ट्राईक या अत्यंत गाजलेल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला अभिनेता विक्की कौशल याला डेंग्यू पुढे शरणागती पत्करावी लागली आहे. उरी मध्ये शत्रूला ललकारणाऱ्या दमदार फौजी अधिकाऱ्याची भूमिका साकारणारया विक्कीला डेंग्यू झाल्याने त्याचे वजन झपाट्याने उतरले आहे आणि तो खूपच अशक्त आणि बारीक झाला आहे. मुंबइत बांद्रा येथे तो नुकताच दिसला तेव्हा त्याने मिडिया फोटोग्राफर साठी पोझ दिली. विक्की अजून डेंग्यूमधून पूर्ण बरा झालेला नाही.


त्याचे हे ताजे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अर्थात विक्की कमजोर वाटत असला तरी त्याच्या बोलण्यात उत्साह दिसून आला. गेले काही दिवस तो अरुणाचलच्या तवांग मध्ये भारतीय सेना जवानांसोबत मुक्कामाला होता. तेथे त्याने जवानांना रोट्या बनवून खिलवल्याचे फोटो शेअर केले होते. करन जोहरने विक्कीला त्याच्या बिग बजेट तख्त चित्रपटासाठी साईन केले असल्याचे समजते. विक्की सध्या उधमसिंग चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त असून पुढच्या वर्षात फिल्ड मार्शल माणेकशा यांच्या भूमिकेत तो दिसेल.

Leave a Comment