तब्बल एवढ्या कोटींना विकले गेले हे दुर्मिळ नाणे


अमेरिकेतील उताह येथील एका उद्योगपतीने शिकागो येथे झालेल्या लिलावात एक दुर्मिळ नाणे तब्बल 1.32 मिलियन डॉलरला (9.45 करोड रूपये) खरेदी केले आहे.

हे बार्बर डाईम म्हणजेच नाणे 1894 मध्ये बनवण्यात आले असून, अशी केवळ 24 नाणीच बनवण्यात आली होती. एवढी मोठी रक्कम देऊन 10 सेंटचे हे नाणे खरेदी करण्याचे कारण म्हणजे यासारखी केवळ 9 नाणीच सध्या अस्तित्वात आहेत.

1894 मध्ये बनवण्यात आलेली ही नाणी बार्बर डाईम नावाने ओळखली जातात कारण यांना चार्ल्स ई बार्बर यांनी बनवली होती. हे दुर्मिळ नाणे रिएल साल्ट लेक टीमचे मालक डेल लॉय हान्सेन यांनी खरेदी केले. याआधी 1988 मध्ये एनबीए टीम लॉस एन्जेल्स लेकर्सचे मालक जेरी बस्स यांनी खरेदी केले होते.

हान्सेन हे कॉईन कलेक्टर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत 1792 पासून ते आजपर्यंत अमेरिकेतील सर्व नाणी जमा केली आहेत. आपले कलेक्शन पुर्ण करण्यासाठी त्यांना केवळ 6 नाण्यांची गरज आहे. मात्र काही नाणी विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.

2016 मध्ये देखील 1894 मधील या दुर्मिळ नाण्यांपैकी एक नाणे एका व्यक्तीने तब्बल 2 मिलियन डॉलरमध्ये खरेदी केले होते.

1894 मध्ये जॉन डँगेट यांनी आपली मुलगी हँली हिला अशी तीन नाणी दिली होती. 1950 मध्ये तिने दोन नाणी सँन फ्रँन्सिस्को येथील एका डिलरला विकली होती. तर लहानपणीच एक नाणे आईस्क्रीम घेण्यासाठी खर्च केले होते.

Leave a Comment