युजर्ससाठी टिक-टॉकने सुरू केले खास ‘सोशल’ अभियान


लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकने  युजर्सनी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करावा यासाठी एक जागरूकता अभियान सुरू केले आहे. अभियानाद्वारे सोशल मीडिया प्लँटफॉर्मचा वापर जबाबदारीने व सुरक्षितरित्या कसा करावा हे सांगितले जात आहे. या अभियानाला ‘हॅश वेट ए सेंकेंड टू रिफ्लेक्ट’ असे नाव देण्यात आले आहे.

या अभियानाचा अर्थ युजर्सने एक क्षण थांबत आपण शेअर करत असलेल्या कंटेंटचा विचार करणे हा आहे. या अभियानासाठी टिकटॉकने डिजिटल इम्पावरमेंट फाउंडेशन (डीआएफ) बरोबर भागिदारी केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 10 राज्यांमधील प्रमुख शहरांमध्ये हे अभियान चालवले जाणार आहे.

टिकटॉकचे संचालक नितिन सलूजांनी सांगितले की, इंटरनेटचा वापर देशभरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे युजर्सला सुरक्षिततेबाबत माहिती देणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की, हॅश वेट ए सेंकेंड टू रिफ्लेक्ट अभियान सर्व इंटरनेट युजर्स, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांना या प्लॅटफॉर्मचा वापर अधिक जबाबदारीने व सुरक्षितरित्या करण्यासाठी प्रेरित करेल.

तसेच, या अभियानांतर्गत, ‘बुरा न पोस्ट करो, बुरा न शेयर करो और बुरा न कमेंट करो’, असे अभियान देखील चालवले जात आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment