सेक्रेड गेम्सच्या ‘त्या’ डॉयलॉगवर ‘पार्ले जी’चे भन्नाट ट्विट


सेक्रेड गेम्स सिरिजचा दुसरा सिझन काही दिवसांपुर्वीच रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून या सिझनची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेटफ्लिक्सच्या या क्राईम थ्रिलरमध्ये सैफ अली खान आणि नवाजउद्दीन सिद्दकी यांची प्रमुख भूमिका असून, सिझन रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर मिम्सचे वादळच आले आहे.


सीझनमधील एका डॉयलॉगची तर सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. चित्रपटाती बंटी नावाचे पात्र गणेश गायतोंडेशी बोलताना म्हणतो,  “यहां पारले जी खाना पड़ रहा है काली चाय में डुबोकर.” बंटीचा हा डॉयलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या डॉयलॉगवर फनी मिम्स बनवल्या जात आहेत. पार्ले जीने देखील या मिम्सचा वापर करत ट्विट केले.

पार्ल जीने ट्विट केले की, पार्ले जीला अभिमान आहे की, एका कलाकाराच्या संघर्षात आम्ही आमचा सहभाग आहे.


पार्ले जीच्या या ट्विटनंतर नेटफ्लिक्सने देखील पार्ले जीचा उल्लेख करत ट्विट केले.


नेटफ्लिक्स आणि पार्ले जीच्या ट्विटनंतर फूड डिल्हिवरी कंपनी स्विगी देखील मागे राहिली नाही. स्विगीने देखील ‘चहा पाठवू का’ असे विचारले.

Leave a Comment