मारुतीने सुझुकीने लाँच केली ‘एक्सएल ६’ ही शानदार कार


देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने एमपीवी एक्सएल 6 कार भारतात लाँच केली आहे. 6 सीट असणारी ही कार मारूतीच्या  अर्टिगा कार सारखी आहे. असे असले तरी कंपनीने या नवीन कारचे डिझाईन अर्टिगापेक्षा वेगळे आहे.

मारूतीची ही पहिली 6 सीट कार आहे, जी नेक्सा प्लँटफॉर्मद्वारे विकली जाणार आहे. कारच्या बेस मॉडेलची किंमत 9.79 लाख रूपये आहे. पेट्रोज इंजिन असणाऱ्या कारला कंपनीने मॅन्युअल आणि एमएमटी ट्रांसमिशन असे दोन्हीमध्ये लाँच केले आहे. XL6 Zeta MT हे बेस वेरिएंटअसून, याची एक्स शोरूम किंमत 9.79 लाख रूपये आहे. तर एटी वर्जनची किंमत 10.89 लाख रूपये आहे. तर कारचे तिसरे मॉडेल अल्फा एमटीची किंमत 10.46 लाख रूपये आहे.

अर्टिगाच्या तुलनेत एक्सएल 6 मध्ये मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आले आहेत. नवीन हेडलाईड्स, बोनट हे सर्व नवीन डिझाईनमध्ये देण्यात आले आहे. समोर मोठी ग्रिल देण्यात आली आहे. कारमध्ये रुफ रेल्सची सुविधाही देण्यात आली आहे. मारूती एक्सएलचे कँबिन काळ्या रंगाचे आहे. यामध्ये 3 लाईनमध्ये 6 सीट्स देण्यात आले आहेत. 6 सीट असणाऱ्या या कारमध्ये 2 कँप्टन सीट्स आहेत. कारमध्ये स्मार्टप्ले स्टूडियो इन्फोटेनमेंट सिस्टम, हाइट अँडजेस्टेबल ड्राइवर सीट आणि रियर वॉशर/वाइपर सारखे फिचर देण्यात आले आहेत. तसेच रिवर्स कँमरा, लेदर सिट्स आणि क्रूज कंट्रोल या सुविधा देखील मिळतील.

या कारमध्ये अर्टिगामध्ये देण्यात येणारे 1.5 पेट्रोल इंजिन आहे. हे  इंजिन बीएस-6 नॉर्म्सनुसार काम करेल. तसेच ही कार सध्या डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध नाही. मात्र कंपनीनुसार, मागणीनुसार डिझेल इंजिनमध्ये देखील कार उपलब्ध करून देण्यात येईल. मारूतीची ही कार आता रेनॉल्ट लॉजी आणि महिंद्राच्या मराझ्झोला टक्कर देणार आहे.

Leave a Comment