इतरांपेक्षा का वेगळे आहे जिओ गिगाफायबर ?


काही दिवसांपुर्वी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ गीगा फायबरबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिओ गीगा फायबर ब्रॉडबँडच्या प्लँनची सुरूवातीची किंमत ही 700 रूपये असेल व यामध्ये ग्राहकांना 100 एमबीपीएस स्पीड मिळेल.

मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की गीगा फायबरबरोबरच ग्राहकांना 4 के सेटटॉप बॉक्स आणि फ्री एलईडी टिव्ही देखील मिळेल. त्यामुळे आता प्रश्न आहे की, गीगा फायबर बॉक्समध्ये मिळणाऱ्या 4के सेटटॉप बॉक्समध्ये असे वेगळे काय आहे जे इतर सेटटॉप बॉक्समध्ये नाही. चला तर मग जाणून घेऊया.

लोकल केबल ऑपरेटर्सबरोबर भागिदारी –
जिओ गीगा फायबरबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे जिओने डेन नेटवर्क आणि हँथवे सारख्या लोकल केबल ऑपरेटर्सबरोबर भागिदारी करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिओ गीगा फायबरच्या ग्राहकांना या ऑपरेटर्सच्या केबलवर दिसणारे चँनेल देखील बघायला मिळणार आहेत.

ऑन डिमांड व्हिडीओ –
याचबरोबर जिओ गीगा फायबर ग्राहकांना व्हिडीओ ऑन डिमांड्स अप्सचा देखील जास्त फायदा मिळेल. तसेच ग्राहकांना जिओ सावन, जिओ टिव्ही आणि अन्य अप्स देखील वापरता येतील.

गेमिंग –
जिओ सेटटॉप बॉक्सबरोबर आणखी एक खास फिचर असणार आहे ते म्हणजे गेमिंगचे. जिओने गेमिंगसाठी मायक्रोसॉफ्ट आणि पबजी गेमची कंपनी टेंसेंटबरोबर भागिदारी केली आहे. तसेच या सेटटॉप बॉक्समध्ये सर्व प्ले-स्टेशन सपोर्ट करतील.

एमआर आणि वीआर सपोर्ट –
गेमिंग खेळताना शानदार अनुभव येण्यासाठी जिओ मिक्सड रियालटी (एमआर) आणि वर्चुअल रियलिटी (वीआर) या सुविधा देणार आहे. तसेच गीगा फायबरबरोबर तुम्हाला जिओकॉलचा पर्याय देखील मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही मोफतमध्ये एकाचवेळी चार जणांबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे बोलू शकता.

Leave a Comment