नक्की काय आहे आयएनएक्स प्रकरण?


बहुचर्चित आयएनएक्स मीडिया केसमध्ये मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला. जामीन फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीबीआय त्यांच्या घरी दाखल झाली, मात्र ते घरी नव्हते. शक्यता वर्तवण्यात येत आहे की, या केसमध्ये सीबीआय आणि ईडीकडून त्यांना अटक करण्यात येऊ शकते. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

आयएनएक्स मिडिया ग्रुपला २007 मध्ये 305 करोड रुपयांची रक्कम परदेशातून मिळाली. या गुंतवणूकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जाणून घेऊया काय आहे आयएनएक्स प्रकरण  –
15 मे 2017 –  सीबीआयने पहिल्यांदा आयएनएक्स मीडिया प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल केली. यामध्ये आरोप करण्यात आला होता की, 2007 मध्ये 305 करोड रूपये परकीय रक्कम घेण्यासंदर्भात एफआयपीबीची मंजूरी देताना अनियमितता दिसून आली. हे सर्व झाले त्यावेळी कार्ति चिदंबरमचे वडील पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.

16 जून 2017 – केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एफआरआरओ आणि ब्युरो ऑफ इमिग्रेशनने कार्ति चिदंबरमच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी केले.

10 ऑगस्ट 2017 – मद्रास उच्च न्यायालयाने कार्ति चिदंबरम आणि अन्य चार जणांविरोधात जारी करण्यात आलेल्या लुक आउट सर्कुलरवर रोख आणली.

22 सप्टेंबर 2017 – सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कार्ति चिदंबरम यांना परदेश दौरा करण्यापासून रोखण्यात आले होते कारण ते पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे अनेक परदेशी बँक खाते बंद करत आहेत.

9 ऑक्टोंबर 2017 – कार्ति चिदंबरमने मुलीला एक युनिवर्सिटीमध्ये अँडमिशन घेण्यासाठी ब्रिटनचा प्रवास करण्याची सर्वाच्च न्यायालयात मागणी केली होती. तसेच त्यांनी कोणत्याही बँकेचा दौरा करणार नसल्याचे देखील म्हटले होते.

20 नोव्हेंबर 2017 – सर्वाच्च न्यायालयाने त्यांनी ब्रिटनला जाण्याची परवानगी दिली.

16 फेब्रुवारी 2018 – कार्ति चिदंबरमचे सीए एस भास्कररमन यांनी सीबीआयने अटक केली.

28 फेब्रुवारी 2018 – कार्ति चिदंबरमला 23 दिवस जेलमध्ये काढल्यानंतर जामीन मिळाला.

11 ऑक्टोंबर 2018 – ईडीने आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात कार्ति चिदंबरमची भारत, ब्रिटन आणि स्पेरनमधील 54 करोड रूपयांच्या संपत्तीवर टाच आणली.

11 जुलै 2019 – जेलमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जी साक्षीदार बनण्यास तयार झाली.

20 ऑगस्ट 2019 –  दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला.

Leave a Comment