वुमेन्स क्रिकेट सुपर लीगमध्ये इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅटने विक्रमी खेळी केली आहे. डॅनियलने साउथर्न वायपर्सकडून खेळताना 60 चेंडूत 110 धावांची खेळी केली. या स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. याआधी सुझी बेट्सने 2017 मध्ये 119 धावा केल्या होत्या.
विराटला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूची विक्रमी खेळी!
डॅनियल वॅटने सामन्यानंतर सांगितले की ही खेळपट्टी विचित्र होती. पहिल्यांदा ज्यावर खूप संघर्ष करावा लागला. यावर स्वत:लाच सपोर्ट करावा लागत होता. एवढ्या धावा या खेळपट्टीवर कशा झाल्या याचे आश्चर्य वाटत असल्याचे डॅनियलने म्हटले. मोठ्या खेळीबद्दल मैदानावर उतरत असताना विचार केला नव्हता. फक्त फटके फलंदाजी करताना मारायचे काम करत होते. गेल्या 15 महिन्यांत मी शतक न झळकवल्यामुळे आता शतक झळकावल्यानंतर खूप चांगले वाटत असल्याचे डॅनियल वॅट म्हणाली.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची डॅनियल वॅट मोठी चाहती आहे. माझ्याशी लग्न कर असेही तिने विराट कोहलीला म्हटले होते. ती भारतात विराट कोहलीबद्दल ट्विट केल्याने अनेकदा ट्विटर ट्रेंडमध्ये आली आहे. तेव्हा विराट कोहलीने डॅनियलने दिलेल्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, विराटने काही काळानंतर डॅनिलयला बॅट भेट दिली होती. डॅनियलने याच बॅटने पुढे शतक झळकवल्याचे सांगितले होते.