सीमेवर मास्क परिधान करून या खास ‘शत्रू’शी लढत आहेत जवान


भारत-बांग्लादेश सीमेवरील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) जवानांना एका वेगळ्याच प्रकारच्या शत्रूचा सामना करावा लागत आहे. जवान या शत्रूचा सामना करण्यासाठी एक खास मास्क परिधान करत आहे. हा मास्क एका जाळी प्रमाणे आहे. त्रिपुरा आणि मिझोरममध्ये मलेरियाचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. येथे मच्छर चावल्याने मलेरिया होण्याचा धोका अधिक आहे. याचकारणामुळे भारतीय जवान मास्क परिधान करत आहेत.

त्रिपुराची सीमा बांग्लादेशला लागून आहे. मच्छरांपासून वाचण्यासाठी येथील जवान फुल बॉडी युनिफॉर्म, ग्लोव्स घालतात. तसेच धुर करणारी एक मशीन देखील जवळ ठेवतात, ज्यामुळे ड्युटी करताना मच्छर जवळ येणार नाहीत.

बांग्लादेशच्या सीमेवर जवानांना आंतकवादी, स्मगलर यांचा सामना करावा लागतो. मात्र मच्छरांमुळे जवानांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रिपोर्टनुसार, काही वर्षांपुर्वी बांग्लादेशच्या सीमेवर असलेल्या जवानांना मोठ्या प्रमाणात मलेरिया झाला होता. अनेकांचा यामध्ये मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे येथील जवानांसाठी खास प्रोटोकॉल बनवण्यात आला आहे.

त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. येथे बीएसएफची 71 वी बटालियन तैनात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पेट्रोलिंग करताना जवान मेडिकेटेड नाइलॉन नेट  परिधान करतात. बटालियनचे हेडक्वार्टर अंबासामध्ये देखील मच्छरांपासून बचाव करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment