महाकाय अजगरला बघुन लोकांची वळली बोबडी


आसामच्या नागाव येथे अशी घटना घडली की, ज्याने सर्वच जण हैराण झाले आहेत. पाऊस आणि पुरामुळे अनेक जनावरं जंगल आणि नदीसोडून शहराकडे येत आहेत. यामुळे लोकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे. पुराच्या पाण्यात मगरी, गाई असे प्राणी वाहून आल्याचे तर आपण अनेकवेळा ऐकले असेल. मात्र आसामच्या नागावमध्ये 14 फुटांपेक्षा अधिक लांब अजगरच आला आहे.

हा अजगर बघून स्थानिक लोक चांगलीच घाबरली. अखेर वन विभागने शर्तीचे प्रयत्न करत या अजगराला पगडले व पुन्हा जंगलात सोडले. नागावमध्ये शिरलेले हा अजगर 14.4 फुट लांब होता. वनविभागाने स्थानिक लोकांची मदत घेत या अजगराला पकडले. हा अजगर एवढा लांब आहे की, त्याला उचलण्यासाठी 7 जण लागले.

फोटोमध्ये दिसते की, लोकांनी कशाप्रकारे या अजगराला पकडले आहे. पकडल्यानंतर या अजगराला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. जगभरात सापांच्या 3000 प्रजाती आहे. तर भारतात 300 प्रजातींचे साप आढळून येतात. यातील 50 टक्के साप विषारी असतात.

Leave a Comment