पेरूमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना लुप्त झालेल्या प्राचीन शहरांचा शोध घेत असताना 3800 वर्ष जुने भित्तीचित्र सापडले आहे. हे भित्तीचित्र देशाच्या उत्तरेकडील भागात विचामा शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर सापडले आहे. या भित्तीचित्रात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या वरती बसून त्याच्या खांद्यावर हात ठेऊन बसली आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ टँटिना अबाड यांनी सांगितले की, हे ‘चित्र पाणी येणार आहे’ अशा घोषणा दर्शवते. त्यांनी सांगितले की, हे चित्र त्याकाळातील पाणी संकंटाविषयी सांगते. विचामा येथे 2007 पासून उत्खनन सुरू असून, प्राचीन शहरांमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि आर्किटेक्चर याविषयी शोध घेण्यात येत आहे. काही जणांचा असा विश्वास आहे, पर्यावरण बदलामुळे येथील प्राचीन शहरे नाहीशी झाली.
या ठिकाणी सापडले 3800 वर्षापुर्वीचे भित्तीचित्र
पुरातत्वशास्त्राज्ञांनुसार, 1600 ईसा पुर्व येथील सभ्यता अचानकपणे गायब झाली. मागील आठवड्यातच याच ठिकाणी साप आणि माणसाचे डोके असलेले भित्तिचित्र सापडले होते. या चित्रात डोळे बंद असलेल्या माणसांचे डोके होते व त्यांच्याभोवती दोन साप होते.