भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तान्यांची टिवटिवाट ट्विटरने केली बंद


पाकिस्तानमधून सतत करण्यात येणाऱ्या भारत विरोधी ट्विट्सबाबत भारतीय प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर मायक्रोब्लॉगिंग साईट्स ट्विटरने पाकिस्तानचे 200 ट्विटर अकाउंट्स बंद केले आहेत.  पाकिस्तान सरकारने ट्विटरला सांगितले की, जे 200 अकाउंटस बंद करण्यात आले आहेत ते काश्मीर मुद्यावर ट्विट करत होते.

मागील आठवड्यात पाकिस्तानच्या अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की, काश्मीरच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर त्यांचे अकाउंट संस्पेंड करण्यात आले. हा दावा काश्मीरचे समर्थन करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्ते, सरकारी अधिकारी आणि सैन्याच्या प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ‘स्टॉप सस्पेंडिंग पाकिस्तानीज’ ट्रेंड करण्यास सुरूवात झाली.

रविवारी इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशन्चे मेजर जनरल आसिफ गफूर म्हणाले की, सरकारने काश्मीर मुद्यावर पोस्ट केल्यानंतर अकाउंट्स बंद होण्याचा मुद्दा ट्विटर आणि फेसबुक समोर मांडला आहे.

ट्विटरकडे करण्यात आलेल्या तक्रारीबद्दलची माहिती देताना डिजीटल मीडिया संबंधीत मुख्य सहायक अर्सलान खालिदने सांगितले की, पाकिस्तान टेलीकम्यूनिकेशन अथॉरिटी  प्रकरणाबाबत ट्विटरच्या क्षेत्रीय कार्यालयात तक्रार दिली आहे.

Leave a Comment