या आयफोन ११ मध्ये चंद्रावरच्या दगडांचा वापर


अॅपल सप्टेंबर मध्ये आयफोन ११ लाँच करणार असल्याचे जाहीर केले गेले असले तरी कस्टमाइज्ड व महागडे आयफोन बनविणाऱ्या रशियन लक्झरी ब्रांड कॅव्हीअरने त्यापूर्वीच आयफोन ११चे नवे फ्लॅगशिप कस्टमाइज्ड व्हर्जन तयार केले आहे. प्रोटोटाईप बेस्ड डिझाईन असलेल्या या फोनमध्ये उल्कापिंडाचे तसेच चंद्रावरून आणलेल्या दगडांचे तुकडे वापरले गेले आहेत. हा फोन खऱ्या अर्थाने अंतराळ सामग्रीतून बनविला गेला असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर मौल्यवान रत्ने आणि फिरणारे चक्र आहे. या फोनसाठी ग्राहकाला ४९९९० डॉलर्स म्हणजे साधारण ३६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. इतके पैसे मोजायची तयारी नसेल तर या फोनचे स्वस्त व्हेरीयंट उपलब्ध केले जाणार असून त्याचे प्रीबुकिंग सुरु झाले आहे. स्वस्त व्हेरीयंट ४४०० डॉलर्स म्हणजे ३,१५,००० रुपयात मिळणार आहे.

या आयफोन एक्सप्लोरर मध्ये नक्षीदार स्टोन्सचा वापर केला गेला असून हा फोन हँडमेड आहे. फोनला टायटॅनियमची बॅक असून डिझाईन मध्ये सॅटेलाइटची झलक दिसते आहे. या दोन ऑप्शन मध्ये सोयुझ व्हेरीयंटचा समावेश असून त्यात छोट्या आकाराचे सोयुझ एमएस – ०१ स्पेसशिप मधील काही पार्टसचा वापर केला गेला आहे.

आयफोन ११ मध्ये आयफोन ११, आयफोन ११ प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स अशी तीन व्हेरीयंट सादर केली जात असल्याचे संकेत अॅपलने यापूर्वीच दिले आहेत. फोनच्या रिअरवर आयफोन असे नाव नसेल तर अॅपलचा लोगो असेल असेही समजते.

Leave a Comment