… अन् निळ्या लाटांनी व्यापला समुद्रकिनारा


रविवारी रात्री चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोडवरील समुद्रकिनारी गेलेल्या लोकांना ही आश्चर्यकारक गोष्ट बघायला मिळाली. समुद्रात येणाऱ्या लाटा या निळ्या रंगाच्या आणि चमकणाऱ्या असल्याने बीच असलेले सर्वच जण आश्चर्यचकित झाले. या घटनेने वैज्ञानिकांना देखील विचार करण्यास भाग पाडले आहे.

या निळ्या रंगांच्या लाटांना अथवा तरंगाना वैज्ञानिक भाषेत बायोलुमिनेसेंस (Bio luminescence) म्हटले जाते. हे . यह बायोल्यूमिनसेंट फाइटोप्लांकटन ( Bio luminescent Phytoplankton) नावाच्या शैवाळामुळे होते. याला सी स्पार्कल असे देखील म्हणतात.


अशाच प्रकारच्या लाटा मागील वर्षी मालदीव येथील समुद्रामध्ये दिसल्या होत्या. तसेच कँलिफोर्नियाच्या पेसिफिक समुद्रात देखील निळ्या रंगाचे तरंग वारंवार पाहिले जातात.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, समुद्रावरील इकोसिस्टममध्ये बदल झाल्याने असे घडू शकते. यामुळे तामिळनाडूच्या समुद्रवरील पर्यावरण नष्ट होऊ शकते. तसेच तापमान वाढ आणि पर्यावरणातील बदलाचे देखील हे संकेत असू शकतात.

मात्र समुद्र किनारी असलेल्या लोकांनी या घटनेचा भरपूर आनंद घेतला. अनेकांनी या निळ्या रंगाच्या लाटेचे फोटो देखील शेअर केले.

Leave a Comment