केवळ मोजक्याच लोकांना मिळणार ही 64 कोटींची सर्वात पॉवरफुल कार


बुगाटीने त्यांची नवी हायपर कार सेंटोडायसी या नावाने सादर केली असून कंपनीच्या आत्तापर्यंतच्या कार्स मधली ही सर्वात पॉवरफुल कार असल्याचा दावा केला जात आहे.

कंपनीचा ११० वा वर्धापनदिन आणि कंपनीच्या १९९१ मध्ये आलेल्या ईबी ११० सुपरकारला मानवंदना देण्याच्या उद्देशाने ही नवी कार सादर केली गेली आहे. ही लिमिटेड एडिशन कार असून अश्या फक्त १० कार्स बनविल्या जाणार आहेत. या सर्व १० कार्स अगोदरच विकल्या गेल्या असल्याचे समजते.

सेंटोडायसी हा इटालियन शब्द असून त्याचा अर्थ ११० असा आहे. ही सुपरस्पोर्ट्स कार चिरोनवर आधारित आहे. कारला मॉडर्न आणि अॅग्रेसिव्ह लुक दिला गेला आहे.

८.० लिटरचे क्वॉड टर्बोचार्ज्ड डब्ल्यू १६ इंजिन दिले गेले असून ही कार ० ते १०० किमीचा वेग फक्त २.४ सेकंदात घेते.

२०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला ६.१ सेकंद तर ३०० किमीचा वेग घेण्यासाठी १३.१ सेकंद लागतात. कारचा टॉप स्पीड आहे ताशी ३८० किमी. या कारची सुरवातीची किंमत ७.४ दशलक्ष पौंड म्हणजे अंदाजे ६४ कोटी रुपये आहे. कर वेगळा भरावा लागणार आहे.

Leave a Comment