वाढदिवस जो जोनसचा आणि चर्चा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची


अमेरिकन सिंगर जो जोनसने नुकताच आपला 30 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. काही दिवसांपुर्वीच जो जोनसने ब्रिटिश अभिनेत्री आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ स्टार सोफिया टर्नरबरोबर लग्न केले आहे.

वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. जो जोनसच्या वाढदिवसाचा केक देखील सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. याचे कारण ही तसे खास होते. या केकवर जो जोनस आणि सोफिया टर्नरचे पुतळे बनवण्यात आले होते. याशिवाय केकवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सिरीजची जादू देखील पाहायला मिळाली. केकवर असलेल्या आयर्न थ्रोनवर जोचा पुतळा बसलेला होता तर सोफिया त्याच्या बाजूला उभी आहे. निक जोनसने केकचा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला.


या पार्टीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो जोनस गाणे गात असताना अचानक सोफियामध्ये येत त्याला सरप्राईज देते आणि स्टेजवरच केक कापला जातो. शुभेच्छा देणारे गाणेही गायले.


हा व्हिडीओ शेअर करत जो जोनसने लिहिले की,  यापेक्षा अधिक चांगली रात्र असू शकत नाही. तुम्हा सर्वांना धन्यवाद. वाढदिवसादिवशी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांबरोबर मी आहे, यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते.

Leave a Comment