भारतात लाँच झाली ह्युंडाईची ग्रँड आय10 निओस ही शानदार कार


ह्युंडाईने आज ग्रँड आय10 निओस ही कार भारतात लाँच केली. या गाडीची किंमत 5 लाखापासून सुरू आहे. ग्रँ आय 10 निओस पाच वेगवेगळ्या प्रकारात लाँच करण्यात आली आहे. नवीन कार ह्युंडाईची थर्ड जनरेशन कार आहे. या कारचे डिझाईन सध्या बाजारात असलेल्या ग्रँड आय10 मॉडेल पेक्षा वेगळा आहे. ही कार 8 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

ग्रँड आय10 निओसमध्ये देण्यात आलेले शार्प प्रोजेक्टर हँडलेम्प्स, एलईडी डीआरएल, केसकेडिंग ग्रिल, बोनटवर अग्रेसिव लाइन्स आणि फॉग लँम्प्स याचे डिझाईन शानदार बनवते.

ग्रँड आय10 निओसचे इंटेरियर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे आहे. यामध्ये अँड्राईड ऑटो अपल कारप्ले बरोबर 8-इंचचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, 3-स्पोक मल्टी-फंक्शन स्टीयरिंग वील, ऑटो क्लाइमेट कंट्रोल, रियर एसी वेंट्स आणि वायरलेस चार्जर, पुश बटन स्टार्ट/स्टॉप स्मार्ट फिचर्स मिळतील.

ग्रँड आय10 निओसमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 85 बीएचपी पॉवर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करते. डीझेल इंजिन देखील 1.2 लीटरचे असून, ते 74 बीएचपी पॉवर आणि 190 एनएम टॉर्क जनरेट करते. ह्युंडाईने नवीन कारला Era, Magna, Sportz, Asta, Dual-Tone Sportz अशा चार प्रकारात लाँच केले आहे. याची किंमत 4,99,990 रूपयांपासून सुरू होते ते 7,99,450 रूपयांपर्यंत आहे.

Leave a Comment