प्रिन्स विलियम्स आणि केट यांचा पाक दौरा रद्द होण्याची शक्यता


या वर्षअखेरी होणारा ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स विलियम्स आणि डचेस ऑफ ड्युक केट मिडिलटन यांचा नियोजित पाक दौरा रद्द केला जाईल असे संकेत दिले गेले आहेत. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० भारत सरकारने रद्द केल्यावर निर्माण झालेल्या भारत पाक तणावामुळे हा दौरा अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी द न्यूज इंटरनॅशनलने ब्रिटनच्या फॉरेन अँड कॉमनवेल्थ ऑफिसच्या घोषणेचा हवाला देऊन हा अंदाज व्यक्त केला आहे.

जूनमध्ये शाही परिवाराच्या अधिकृत पत्रकात केट आणि विलियम फॉरेन अँड कॉमनवेल्थ ऑफिसच्या वतीने पाकिस्तानचा दौरा करणार असल्याची घोषणा केली गेली होती. मात्र पाकिस्तानातील अशांतता आणि तेथील बदललेले वातावरण लक्षात घेता शाही जोडप्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करण्याचा विचार गंभीरपणे सुरु असल्याचे समजते. यापूर्वी २००६ मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला द. आशियाई देशांच्या दौर्यावर आले होते. त्यानंतर आता प्रथमच विलियम आणि केट पाकिस्तान दौरा करणार होते. ब्रिटीश शाही परिवारातील सदस्याचा हा पहिलाच अधिकृत पाक दौरा होता. १९९१ मध्ये प्रिन्सेस डायना यांनी पाकिस्तानला भेट दिली होती.

Leave a Comment