चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी महिला पोलिसाने लढवली आयडियाची कल्पना


मागील काही दिवसांपासून एका महिला पोलिस ऑफिसरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोलिस ऑफिसरने आपल्या चपळतेने आणि समजुतदारपणामुळे एका दोन हफ्त्याच्या बाळाला नवीन जीवन दिले आहे. गुदमरल्यामुळे बाळ श्वास घेऊ शकत नव्हते. तेव्हा या महिलने फर्स्ट एड देत त्याचे प्राण वाचवले. घटनेचा व्हिडीओ समोर येताच, लोकांनी त्या महिला ऑफिसरचे कौतूक केले.


अमेरिकेच्या वर्जिनिया शहरातील डँनविले पोलिस विभागाने घटनेचा व्हिडीओ ट्विट केला. व्हिडीओमध्ये दिसते की, कसे महिला पोलिस ऑफिसर मेलिसा केरीने एका नवजात बाळाला वाचवले.


केरी एका रेस्टोरंटमध्ये लंच करत होत्या. तेव्हा एक महिला पळत येत दोन आठवड्यांच्या बाळाला मदत करण्यासाठी सांगत आहे. व्हिडीमध्ये दिसते की, केरी चपळतेने बाळाजवळ जाते आणि त्याला फर्स्ट एड देते. बाळ लगेच श्वास घेण्यास सुरूवात करते.


पोलिस विभागाने ऑफिसर आणि बाळाचे फोटो देखील शेअर केले. बाळाची आई म्हणाली की, केरी जर तेथे नसत्या तर आज त्यांचे बाळ जिंवत नसते.

Leave a Comment