असा जाणून घ्या मेमरी कार्डचा खरे-खोटेपणा


सध्या सर्वच स्मार्टफोनमध्ये 512 जीबी पर्यंत इन-बिल्ट स्टोरेज मिळते. काही फोनमध्ये स्टोरेज कमी असेल तर अनेकजण मेमरी कार्ड अथवा एसडी कार्डचा वापर करत असतात. बाजारामध्ये एकाच कंपनीचे मेमरी कार्ड वेगवेगळ्या किंमतीला मिळत असते. अनेकवेळा बनावटी मेमरी कार्ड देखील मिळते. आज आम्ही तुम्हाला बनावटी मेमरी कार्ड कसे ओळखायचे ते सांगणार आहोत.

सर्वात प्रथम मोबाईमध्ये एसडी इनसाइट नावाचे अप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करा. या द्वारे तुम्ही मेमरी कार्डबद्दल त्वरित माहिती मिळवू शकता. अप इन्सटॉल केल्यावर मेमरी कार्ड फोनमध्ये टाका.

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर कार्ड बनवणाऱ्या कंपनीचे नाव, स्टोरेज आणि कार्ड कधी बनवले याची माहिती दिसेल. जर तुम्हाला स्क्रिनवर ‘एससडी कार्ड इज इनवॅलिड’ असा मेसेज आला तर समजून जाकी कार्डमध्ये काहीतरी खराबी आहे.

तुम्हा कार्ड पुन्हा एकदा फॉर्मेट मारून चेक करू शकता. जर स्क्रीनवर ओरिजिन इज अननो असा मेसेज आला तर कार्ड अशा कंपनीचे आहे ज्याची माहिती अपला नाही. अनेकदा फॉर्मेट केल्यानंतर कार्डाचे स्टोरेज कमी होते. त्यामुळे कार्ड नकली असण्याची शक्यता आहे.

कार्ड खरेदी केल्यावर ते पँकिगकरून येत असते. मात्र खरेदी करताना दुकानदाराला कार्ड कसे चेक करायचे ते देखील सांगा व कार्ड बनावटी निघाले तर परत करा. नेहमी कार्ड चांगल्या कंपनीचेच खरेदी करावे व चांगल्या दुकानातून अथवा साइटवरून खरेदी करावे.

Leave a Comment