हजारो किमी दूर असलेल्या पतीचे पत्नीच्या एका कॉलमुळे वाचले प्राण


एका महिलने 22,500 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या पतीचे एका फोन कॉलद्वारे प्राण वाचवले आहेत. पती-पत्नी फोनवर बोलत असताना जोसेफला अचानक स्ट्रोक म्हणजेच ब्रेन अटँक आला. मात्र पत्नीच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले.

ब्रिस्बनमध्ये राहणारी मेडिसन ट्रडेल अमेरिकेत असलेल्या पती जोसेफबरोबर फोनवर बोलत असताना, अचानक तिला जोसेफ व्यवस्थित बोलत नसल्याचे आढळून आले. 31 वर्षीय जोसेफ फोनवर बोलताना अडखळत होता,  शब्द नीट उच्चारत नव्हता. ही गोष्ट लक्षात येताच मेडिसनने मित्राला कॉल करत मदत मागवली.

तिने सांगितले की, मी जोसेफबरोबर फोनवर बोलत असतानाच, मदतीसाठी कॉल केला. तिने मित्राला कॉल केल्यावर त्याने त्वरित एमर्जन्सी सर्विसला कॉल करत मदत मागवली व जोसेफच्या मदतीसाठी धावला.

या स्ट्रोकनंतर जोसेफची उजवी बाजू काम करत नव्हती. मात्र रिहॅबिलेशन सेंटरमध्ये त्यांने वेळ घालवत आपल्या पत्नीच्या मदतीने तो आता चालू शकत आहे. पत्नीच्या सतर्कतेमुळे पतीचे प्राण वाचले. मेडिसनने सांगितले की, अगदी वेळेत जाणीव झाल्याने पुढील मोठी घटना टळली.

31 वर्षीय जोसेफ प्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्ये आरोग्याने व्यवस्थित असणाऱ्या लोकांना स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ऑस्ट्रेलियात 142500 लोक हे स्ट्रोक अटँकमध्ये वाचले आहेत. त्यातील 30 टक्के लोकांचे वय हे 35 पेक्षा कमी आहे.

Leave a Comment