२००७ साली रिलीज झालेल्या अक्षय कुमारचा सुपरहिट हॉरर कॉमेडी असलेल्या भूल भुलैय्याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने एका मानसोपचार तज्ञांची भूमिका साकारली होती. पण आता अभिनेता कार्तिक आर्यनची वर्णी ‘भूल भुलैय्या २’मध्ये अक्षय ऐवजी लागली आहे. नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.
‘भूल भुलैय्या २’मध्ये अक्षयची जागा घेणार हा अभिनेता
“Bhool Bhulaiyaa has always been one of my favorite horror-comedy films and now being part of #BhoolBhulaiyaa2 makes me really happy, especially because I've been a big fan of @akshaykumar sir and it's a great responsibility to take his franchise forward"- #KartikAaryan pic.twitter.com/ZWF3n1DRer
— TeamKartikAaryan (@KartikAaryanHQ) August 19, 2019
कार्तिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘१३ साल बाद’, असे कॅप्शन देऊन ‘भूल भूलैय्या २’ चा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे. कार्तिक या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे फार उत्साही आहे.
#KartikAaryan 's first look from #BhoolBhulaiyaa2 revealed! @TheAaryanKartik pic.twitter.com/5forZxbpat
— TeamKartikAaryan (@KartikAaryanHQ) August 19, 2019
एका मांत्रिकाच्या रुपात, गळ्यात रुद्राक्षांची माळ असणारा, मानवी सांगाड्यांमद्ये बसलेला आणि चेहऱ्यावर वेगळेच भाव कार्तिकच्या चेहऱ्यावर या पोस्टरमध्ये पाहायला मिळतात.
Here's the first look of #KartikAaryan starring #BhoolBhulaiyaa2 @TheAaryanKartik @itsBhushanKumar @Cine1Studios @BazmeeAnees pic.twitter.com/Dog08jt069
— TeamKartikAaryan (@KartikAaryanHQ) August 19, 2019
अनिस बजमी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात कार्तिकबरोबर आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पण चाहत्यांना पहिल्या पोस्टरनंतर चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होईल.