सुब्रमण्यम स्वामींची अरुण जेटलींवर गंभीर टीका


पुणे – आपल्या कार्यकाळात राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे तसेच जनतेवर भरमसाठ कर लावल्याने आर्थिक मंदी जाणवू लागली आहे. अशा शब्दात माजी अर्थमंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या टीका करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर बोलत होते.

सुब्रमण्यम स्वामी पुढे म्हणाले, की 370 कलम हटवण्याएवढेच देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे देखील महत्वाचे आहे. सरकारने कलम 370 संदर्भात माझा सल्ला घेतला होता. पण कुठलाही सल्ला आर्थिक धोरणाबाबत घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आर्टिकल 370 वर वारंवार वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान हे सर्कसमधील एक पात्र आहेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

Leave a Comment