केवायसी करताना चुकूनही डाऊनलोड करुन नका भलते-सलते अॅप


तुम्हीही मोबाईल वॉलेटचा वापर करता का ? आणि हे बँकेच्या अकाउंटशी जोडलेले आहे का ? तर तुम्हा सावधानता बाळगणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसीसाठी कोणतेही अॅप डाऊनलोड केले असेल, तर तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते. भारतातील सर्वात मोठी वॉलेट कंपनी पेटीएमने ग्राहकांसाठी सुचना जारी केली आहे.

केवायसी करताना घ्या काळजी –
पेटीएमने चेतावणी दिली आहे की, जर तुम्ही अकाउंटची केवायसी करत असाल तर काळजी घेतली पाहिजे. एनीडेस्क आणि क्विकस पोर्ट सारखे अॅप वापरू नका. पेटीएमच्या एग्जिक्यूटिवद्वारे केवायसी पुर्ण करा.

रिकामे होऊ शकते अकाउंट –
पेटीएमने नॉटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही केवायसी करण्यासाठी या अॅपचा वापर करत असाल तर तुमचे अकाउंट खाली होऊ शकते. काही दिवसांपुर्वी एनी डेस्क आणि टीम व्यूअर सारख्या अॅपद्वारे फसवणुकीचे प्रकार घडले आहेत.

आरबीआयने देखील केले आहे अलर्ट –
2019 च्या सुरूवातीलाच आरबीआयने या अॅप्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. अनेक बँकानी देखील हे अॅप्स न वापरण्याची ग्राहकांना सुचना दिली आहे.

कशी होती फसवणूक ?
लोकांना फसवण्याठी फसवणूक करणारे बँकेचे कर्मचारी म्हणून कॉल करतात. ग्राहकांना घाबरवले जाते व स्टेप्स फॉलो न केल्यास नेट बँकिंग बंद केले जाईल असे सांगतात. त्यामुळे घाबरून जाऊन ग्राहक माहिती देतात. त्यामुळे बँकेकडूनच कॉल आला आहे की, नाही याची खात्री करून घ्यावी.

कोडद्वारे हँक होतो फोन –
फसवणूक करणारे ग्राहकांना हे रिमोट अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. अॅप इंस्टॉल केल्यानंतर ग्राहकांकडून 9 आकडी वेरिफिकेशन कोड मागितला जातो. याच कोडद्वारे तुमची माहिती चोरली जाते.

बँकेची माहिती –
तुमच्या डिव्हाईसला मॉनिटर करत असतानाच तुमची पुर्ण माहिती काढून घेतली जाते. ग्राहकाने वॉलेटवरून व्यवहार करताच संपुर्ण माहिती हँकर कडे जाते. त्यानंतर तो तुमचे बँक अकाउंट रिकामे करतो.

या टिप्स पाळा –
या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणतेही रिमोट अॅप्स डाऊनलोड करू नका. अॅप डाऊनलोड केले तरीही वेरिफिकेशन कोड कोणालाही शेअर करू नका. लक्षात ठेवा की, बँक कधीही ग्राहकांना कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यास सांगत नाही.

Leave a Comment