पर्यावरण रक्षणासाठी ही मुलगी करणार 6हजार किमी बोटीने प्रवास


पर्यावरण वाचवण्यासाठी जगभरातील आंदोलनांचा चेहरा बनलेली 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग 23 सप्टेंबरला न्युयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या क्लाइमेट समिटमध्ये सहभागी होणार आहे. यासाठी ती विमानाऐवजी 60 फीट लांब यॉटमधून 14 ऑगस्ट रोजीच लंडनमधून निघाली आहे. कार्बन उत्सर्जन होऊ नये म्हणून ती यॉटद्वारे प्रवास करणार आहे. मात्र ग्रेटा ज्या यॉटने प्रवास करत आहे. त्याला आणण्यासाठी दोन लोक विमानाने न्युयॉर्कला जाणार आहेत. म्हणजेच ग्रेटाच्या या प्रवासाने जेवढे कार्बन उत्सर्जन होणार नाही, त्यापेक्षा अधिक उत्सर्जन यॉट परत आणण्यास होणार आहे.

7 दिवसात 6 हजार किमीचा प्रवास –
ग्रेटाला न्युयॉर्कला पोहचण्यासाठी एक आठवडा लाहणार आहे. ती 6 हजार किमीचा प्रवास करणार आहे. तिचे वडिल स्वेंत नाथन ग्रॉमसेन देखील तिच्याबरोबर प्रवास करत आहेत.

यॉटमध्ये सौर पँनेल आणि अंडरवॉटर टर्बाइन लावण्यात आलेले आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही.

ग्रेटामुळे 105 देशांचे शालेय विद्यार्थी संपावर गेले होते –
ग्रेटाला याच वर्षी नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये जर तिला नोबेल पुरस्कार मिळाला तर ती सर्वात कमी वयात हा पुरस्कार मिळवणारी व्यक्ती असेल. तिच्या आंदोलनाचे नाव ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लाइमेट’ असे होते. ग्रेटा दर शनिवारी शाळेच्या बाहेर आंदोलन करते. याचवर्षी 15 मार्चला पर्यावरण संरक्षणासाठी तिने केलेल्या आवाहनामुळे 105 देशातील शालेय विद्यार्थ्यांनी संप केला होता. तिने ऑगस्ट 2018 मध्ये स्विडिश संसदे बाहेर पर्यावरण संरक्षणासाठी आंदोलन केले होते. या संपात जगभरातील 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

मागील वर्षी झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या COP24 बैठकीत तिने सहभागी होत भाषण दिले होते. पंतप्रधान मोदींना देखील तिने व्हिडीओ संदेश पाठवत पर्यावरण संरक्षणासाठी पावले उचलण्याची मागणी केली होती.

Leave a Comment